इगतपुरी तालुका सर्वपक्षीय शोकसभा – स्वर्गीय श्री. अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

 

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधानाने संपूर्ण देश हादरला. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इगतपुरी तालुका सर्वपक्षीय शोकसभेचे दि. ३१ जानेवारी रोजी टाके-घोटी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयातील इनडोअर स्टेडियमध्ये आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मविप्र संचालक अ‍ॅड.संदिप गुळवे, पांडुरंग वारूंगसे( तालूका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), प्राचार्य डाॅ.किरण रकीबे, फिरोजभाई पठाण, संजय खातळे, गोरखभाऊ बोडके( सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस) माजी आमदार श्रीमती निर्मलाताई गावीत, शिवराम झोले, काशिनाथ मेंगाळ, इगतपुरी नगराध्यक्षा श्रीमती शालिनीताई खातळे, उपाध्यक्ष मंगेश शिरोळे, नगरपरिषदेतील सर्व सदस्य, ज्ञानेश्वर लहाने, सुनिल रोकडे, पांडुरंगमामा शिंदे, पांडुरंग ब-हे, संपतराव मुसळे, विविध सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, मान्यवर बहूसंख्यने उपस्थित होते.